एक्स्प्लोर

सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, मानेच्या शिरांना लकवा

डोक्यात विशिष्ट पद्धतीने मारणे, दोन्ही हाताच्या बोटांनी मसाज, त्यानंतर मानेचा मसाज , मान मोडणं वगैरे केलं जातं. पण यापुढे अशा मसाजपासून थोडी सावधानता बाळगा.

नवी दिल्ली: केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेल्यानंतर, अनेकवेळा केशकर्तनकार केस कापून झाल्यावर हेड मसाज, नेक मसाज, बॉडी मसाज वगैरे करतो. केस कापल्या कापल्या हेअर ड्रेसरने तातडीने केलेल्या हेड मसाजमुळे आपल्याला बरं वाटतं. डोक्यात विशिष्ट पद्धतीने मारणे, दोन्ही हाताच्या बोटांनी मसाज, त्यानंतर मानेचा मसाज , मान मोडणं वगैरे केलं जातं. पण यापुढे अशा मसाजपासून थोडी सावधानता बाळगा. कारण सलूनमध्ये जाऊन वारंवार मानेचा मसाज करणं, मान मोडणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. मानेच्या शिरांना लकवा सातत्याने मानेला झटका देऊन, मान मोडून घेतल्यामुळे, दिल्लीतील 54 वर्षीय अजय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शिरांना लकवा मारला आहे. इतकंच नाही त्यांना श्वसनाचा त्रास होत असून, त्यांना आता आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाची मदत घ्यावी लागत आहे. अजय कुमार हे नेहमीप्रमाणे सलूममध्ये गेले होते. तिथे त्यांनी सलूनवाल्याकडून मान मोडून घेतली. पण घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेल्यानंतर, त्यांचं जे निदान झालं ते अत्यंत धक्कादायक होतं. मानेच्या ज्या शिरा श्वसनावर नियंत्रण ठेवतात, त्यांना लकव्याप्रमाणे झटका आला. त्यामुळे त्यांची श्वसनयंत्रणाच निकामी झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे सलूनमध्ये मानेला झटका देण्याचा प्रकार झाल्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं. भारतासारख्या देशात सलूनमध्ये मान मोडण्याचा प्रकार सर्रास केला जातो. पण अशाप्रकारचा मसाज धोकादायक आहे, असं डॉक्टर वारंवार सांगत आले आहेत. उपचाराची गुंतागुंत अजय कुमार यांना मेदांता रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्यावर उपचाराला सुरुवात झाली. आधी त्यांनी हृदयविकारामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. मात्र त्याबाबतच्या उपचारानंतर काहीच फरक पडला नाही. मग त्यांच्यावर निमोनियाचे उपचार झाले. तरीही त्यांना श्वसनाचा त्रास सुरुच होता. डॉक्टरांना वाटलं की त्यांच्या मांसपेशी कमकुवत झाल्या असतील. पण न्यूरो उपचारावेळीही काहीही आढळलं नाही. त्यानंतर दुसऱ्या विभागात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. अजय कुमार हे झोपून श्वास घेऊ शकत होते, मात्र त्यावेळी त्यांचं पोट खूपच आत ओढलं जात होतं. विविध चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी अजय कुमार यांना दिनक्रमाबद्दल विचारलं. त्यावेळी अजय कुमार यांनी 2-3 आठवड्यातून सलूनमध्ये जाऊन मालिश आणि मान मोडून घेत असल्याचं सांगितलं. त्यादरम्यान डॉक्टरांनी मानेच्याही चाचण्या केल्या होत्या. याच चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर अजय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शीरांना लकवा मारल्याचं उघड झालं.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget