एक्स्प्लोर

'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

NCP विरुद्ध NCB हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : NCP विरुद्ध NCB हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं असल्याचा आरोप मलिक यांनी केला असून एक भाजप नेत्याचा मेहुणा होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की 8 ते 10 लोकांना पकडले आहे.  त्यावेळी मी प्रश्न विचारला होता की, एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आलं आहे. जे दोघे सोडण्यात आले, त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही ते म्हणाले.मलिकांनी म्हटलं की, त्या दोन लोकांना आणण्यात आलं होतं आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. मलिक म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? कुठल्या नेत्याने किती बँका बुडावल्या आहेत ते आता मी बाहेर काढणार आहे, असंही ते म्हणाले.

एनसीपी विरुद्ध एनसीबी; कुणाच्या बोलण्यावरून 'हा' अधिकारी धाडी टाकतो, वेळ आली की सगळं बाहेर काढणार : नवाब मलिक

भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या क्रूझवर पकडलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा अधिकार दिला

काल नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर आरोप केले होते. अधिकारी कस्टम मधून एनसीबीला कसा येऊन बसला, त्यासाठी कुठल्या मंत्र्याच्या घरी लॉबिंग करण्यात आली, कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढण्याचं काम करतो हे मी वेळ आली की लवकरच बाहेर काढणार आहे असं म्हटलं होतं.  एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पत्रकार परिषद घेऊन आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला परंतु त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी पूर्णपणे एनसीबीच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यांनी मला उत्तर द्यावं की कुठल्या अधिकाराने त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या क्रूझवर पकडलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचा अधिकार दिला. माझा स्पष्ट आरोप आहे हा अधिकारी केवळ प्रसिध्दीसाठी छापे टाकण्याचं काम करतो आहे. त्यामुळे आता देशात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित राहू लागला आहे, असं मलिक म्हणाले होते.  

Sameer Wankhende: ड्रग माफियांचा कर्दनकाळ असलेला अधिकारी, कोण आहेत समीर वानखेडे?

कुठल्या नेत्याच्या घरी लॉबिंग झाली

नवाब मलिक म्हणाले होते की, कुठल्या अधिकारांनी मनीष भानुशालीने तथाकथित आरोपींना अटक केली. कोण आहे तो? पब्लिसिटीसाठी केवळ हे बॉलिवूड कलाकारांना अटक करत आहेत. मी प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची कुणीचं उत्तरं देत नाही. त्यांनी लक्षात घ्यावं आगामी काळात त्या अधिकाऱ्याला कस्टममधून आणून एनसीबीला कुणी बसवलं. कुठल्या नेत्याच्या घरी ही लॉबिंग झाली. कुणाच्या सांगण्यावरून हा अधिकारी नेमण्यात आला. कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांवर धाडी टाकत आहे. लोकांना घाबरवून पैसे काढण्याचं काम करत आहेत. वेळ आली की मी सगळं बाहेर काढणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली म्हणता मग आरोपी दुसऱ्याच्या ताब्यात दिलेच कसे? हा तर बेकायदेशीर प्रकार. एनसीबी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी बडतर्फची कारवाई करायला हवी.

Aryan Khan Case : ड्रग केसमध्ये Shah Rukh Khan ला टार्गेट केलं जातंय का? आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Embed widget