एक्स्प्लोर
आमदार गजभिये शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विधानभवनात!
यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भिडेंच्या वेशभूषेत आंदोलन केलं होतं.

मुंबई : कायमच वेगवेगळ्या वेशभूषा करुन आंदोलन करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गझबिये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात अधिवेशनात प्रकटले. मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मागण्यांसाठी आज त्यांनी थेट महाराजांच्या भूमिकेत विधानभवनात प्रवेश केला.
यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भिडेंच्या वेशभूषेत आंदोलन केलं होतं. इतकंच नाही तर मोठा आंबा घेऊन ते विधानभवनात आले होते. या आंब्यांवर 'संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे', असंही लिहिलेलं होतं.
तसंच संतांच्या वेशभूषेत भजन-कीर्तनाच्या माध्यमातूनही प्रकाश गजभिये यांनी आंदोलन केलं होतं. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील वेशभूष चर्चेचा विषय ठरली होती.

आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
पुणे