एक्स्प्लोर

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल

मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, या राम कदम यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला.

मुंबई: टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर, असं करायला आमदार म्हणजे काही राजा नाही. आजचं राज्य हे लोकशाहीचं, कायद्याचं राज्य आहे. मुलीला पळवून आणण्याचं आमदारांचं वक्तव्य भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरमधील दहीहंडी दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात मुक्ताफळं उधळली. राम कदम यांच्या या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाडांचा हल्लाबोल आव्हाड म्हणाले, एका मुलीचा बाप म्हणून मला भीती वाटायला लागली. जर राम कदमांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला, तर हे माझ्या मुलीला उचलून घेऊन जायचे. बाप म्हणून मला काळजी वाटायला लागली. अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. पोरगी किंवा पोरगा हा मतभेद नाही, ही गुन्हेगारी आहे. तुम्हाला आवडली की मी घेऊन येतो, असं होत नाही. उलट त्यांनी असं सांगायला हवं होतं की जर तुमचं प्रेम असेल, तर दोघांच्या घरच्यांशी बोला, त्यातून मार्ग काढा. एक बाप म्हणून मी बोलतोय, कारण असं माझ्या पोरीच्या बाबतीत घडलं तर?  कुणाच्याही पोरीच्या बाबतीत घडू शकतं. अशा वक्तव्यांमुळे लोकांची हिम्मत वाढते. राम कदमांसारखा मोठा, पैसेवाला आमदार, मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार असं बोलत असेल तर नक्कीच भीतीदायक आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. अशा घटनांच्या तक्रारी तर कुठे करायच्या? महाराष्ट्रात तक्रार करायची सोय राहिली नाही. लोकांनीच आमचा प्रतिनिधी कसा आहे, हा विचार करावा, असंही आव्हाड म्हणाले. पूर्वी म्हणायचे  'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर' ही परिस्थिती नाही. आज लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे. आमदार म्हणजे काही राजा नाही. इथे प्रत्येकाला समान न्याय आहे, असं आव्हाड यांनी नमूद केलं. राम कदम नेमकं काय म्हणाले "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या.  जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले. राम कदम यांचं स्पष्टीकरण दरम्यान, या प्रकारानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल, अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका, असं राम कदम म्हणाले. यानंतर एबीपी माझाने राम कदम यांना संपूर्ण व्हिडीओ दाखवला. त्यानंतर राम कदम यांनी आपला म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावेळचं वातावरण हलकं फुलकं होतं. काही राजकीय पक्ष या व्हिडीओचं राजकारण करत आहेत, असं राम कदम म्हणाले. संबंधित बातम्या  ..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget