Sharad Pawar Health: शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार
31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, त्रास अधिक जाणवू लागल्यामुळं त्यांना मंगळवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, दुखणं अधिव जाणवू लागल्यामुळं ते एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यांच्यावर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करत पित्ताशयातील खडा काढून टाकण्यात आला.
शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले. तर, राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार हे 31 तारखेला रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, त्यांचं दुखणं वाढल्यामुळं निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईचील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटात दुखू लागल्यामुळं रविवारी ते रुग्णालयात गेले होते. जिथं तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.