Exclusive: समीर वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले; म्हणाल्या..
Maharashtra News: मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Maharashtra News: मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, आमचे कुटुंब तपासासाठी तयार आहे. मलिक यांच्या टार्गेट करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की "कृपया ट्विटर किंवा फेसबुकला न्यायालय किंवा न्याय व्यवस्था समजू नका. तुम्ही तुमचे पुरावे घेऊन कोर्टात जा. तुमचा पुरावा खरा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोर्टात का नाही जात? ट्विट का करता?."
यास्मिन म्हणाल्या की, त्यांना माहित आहे की त्यांचे आरोप चुकीचे आहेत. निराधार आहेत. तुमच्या आरोपांमध्ये योग्यता नाही आणि सर्व खोटे आहेत. त्यामुळेच ते (आरोप) कोर्टात नव्हे तर ट्विटरवर मांडायचे आहेत. तपासाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की "सत्यमेव जयते. आमचा कायदेशीर प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा न्यायावर विश्वास आहे. कोणतीही चौकशी झाली तरी आम्हाला भीती नाही." यास्मिन वानखेडे म्हणाल्या की, आम्हाला मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागत आहे. ही मीडिया ट्रायल सुरू आहे. यात आमचा काहीही दोष नसताना याची उत्तर आम्हाला द्यावी लागतायेत.
Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?
चुकीच्या प्रमाणपत्राच्या आरोपावर यास्मिन काय म्हणाल्या?
चुकीचे प्रमाणपत्र आणि मुस्लिम असण्याच्या प्रश्नावर यास्मिन म्हणाल्या की, हे आरोप नवाब यांचे आहेत. "नवाब मलिक कोण आहे? न्यायालय आहे? तुम्ही (नवाब मलिक यांनी) हे पुरावे कुठे दिलेत, त्याचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे कुठे सांगितले आहे." या प्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. यास्मिन म्हणाल्या की, मला ते ट्विटर हँडलवर टाकायला आवडणार नाही.
Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर
काय आहेत आरोप?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी समीर वानखेडे यांचे वर्णन समीर दाऊद वानखेडे असे केले आहे. समीर वानखेडे यांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ट्विटरवर शेअर केलेले प्रमाणपत्र हे वानखेडे यांचा मूळ जन्म दाखला असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले.