एक्स्प्लोर

नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' केला जाहीर, वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटोही ट्वीट

Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे.

Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज सकाळी सकाळी नवाब मलिकांनी पुन्हा ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत.

Nawab Malik Allegations: एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून कुटुंबाची वंशावळचं जारी..

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गुरुवार 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांच्यात लोखंड वाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे निकाह पार पडला. मेहेरची रक्कम रु.33000 होती. साक्षीदार क्रमांक 2 हा समीर दाऊद वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेचा अजिज खान पती होता, असा दावा मलिकांनी केला आहे. सोबतच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही.  ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे, असं मलिकांनी म्हटलंय.

समीर वानखेडे यांच्याकडून कुटुंबाची वंशावळचं जारी..

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जारी केले आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये समीरचे वडील मेहर जातीतील आहेत. जे SC मध्ये येते. समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर केले असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते.

Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?

नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेले प्रमाणपत्र हे वानखेडेंचे मूळ जन्म प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. नवाब मलिक यांनी काल सोशल मीडियावर दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी लिहिले की ओळखा कोण आहे? तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महापालिकेच्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला आहे. या प्रमाणपत्रात समीरच्या वडिलांचे नाव 'दाऊद क वानखेडे' असे लिहिले आहे. ज्यामध्ये धर्माच्या जागी 'मुस्लिम' असे लिहिले आहे.

या प्रकरणी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Gyandev Wankhede) यांनी मलिक यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करत मी कधीही धर्म बदलला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याने आंतरजातीय विवाह केला होता. परंतु, त्याने किंवा त्याच्या पत्नीने कधीही धर्मांतर केले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget