एक्स्प्लोर

Navneet Rana : मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे भोवणार? खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ

Navneet Rana Mumbai Police : मुंबई पोलीस आता खासदार नवनीत राणाविरोधात खोटे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Navneet Rana Mumbai Police : मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्रयत्न होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तक्रार नोंदवणारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांनी केलेल्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख करण्यात आला. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास राणा यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा घेत असल्याचा व्हिडीओ सादर ट्वीट केला. त्यानंतर आता मुंबई पोलीस आणखी एक व्हिडिओ समोर आणण्याच्या प्रयत्नात आहे. या व्हिडिओत नवनीत राणा यांना त्यांच्या मागणीनंतर प्रसाधनगृहात नेण्यात आले होते. प्रसाधनगृहाबाहेरील सीसीटीव्हीत हे दृष्य कैद झाले आहे. 

नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्याचा याबाबतचा अहवाल लवकरच लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्याच्या अहवालानंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Embed widget