एक्स्प्लोर
नवी मुंबईतील दरोड्याप्रकरणी पोलिसाची पत्नी अटकेत
मुख्य आरोपी अनिता म्हसाणे ही पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असून तिच्यावर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नवी मुंबई : वाशीत भाजी विक्रेत्याच्या घरी पडलेल्या दरोड्याचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 कोटी 9 लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीलाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
27 ऑक्टोबर रोजी वाशीत राहणारे अरुण मेनकुदळे यांच्या घरी भरदिवसा दरोडा टाकून दोन कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. मुख्य आरोपी अनिता म्हसाणे ही पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असून तिच्यावर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दुपारी बारा वाजता वाशी सेक्टर 17 मधील मेनकुदळे यांच्या कुसुम सोसायटीतील घरी आरोपी गेले. कुरिअर देण्याचा बहाणा करुन हा दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी मेनकुदळेंची मुलगी आणि पत्नीला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून घरातील एका खोलीत डांबून ठेवलं. नंतर कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने आणि असा ऐवज चोरला.
मेनकुदळे एपीएमसीमध्ये भाजी व्यापारी आहेत. या प्रकरणी वाशी पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे. आरोपींकडून 80 लाख 80 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि मुंब्रा येथून आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे. दरोड्यात पोलिसाच्या पत्नीसह दोन महिलांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement