एक्स्प्लोर
'आमचं नातं भाऊ-बहिणीचं, पण लोकांच्या संशयामुळे आत्महत्या करतोय'
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात शैलेश आमरे या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.
सोमवारी मध्यरात्री 12.30च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. खान्देश्वर ते मानसरोवर या स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून यात जखमी महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेला वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला असून त्यांना घटनास्थळावरुन सुसाईडनोटही सापडली आहे. आमचं नातं भाऊ-बहिणीचं आहे, पण लोक सतत संशय घेत असल्याने आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement