खळबळजनक! पोटच्या तीन लेकरांची विक्री, आईला अटक, बाप फरार, नवी मुंबईतील घटना
Navi Mumbai Nerul : नियमबाह्य बाळांची विक्री केल्याप्रकरणी आईला अटक केली असली तरी मुलांचा बाप मात्र फरार झाला आहे. यामध्ये बाळ विकत घेणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ (Navi Mumbai Nerul) येथील जन्मदात्यांनीच आपल्या 3 मुलांची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 लाख 90 हजाराला ही मुले विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आईला अटक केली असून मुलींचा बाप फरार झाला आहे. ठाणे महिला व बालविकास विभागाने ही घटना उघडकीस आणली आहे. नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात आरोपी राहत आहेत.
या ठिकाणी आपल्या बाळांना जन्म देऊन ते विकत असल्याची माहिती महिला बालविकास विभागाला डिसेंबर महिन्यात मिळाली होती. यानंतर या विभागाने गरोदर असलेली आरोपी आई शारदा शेख हिच्यावर पाळत ठेवली होती. डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म दिल्यानंतर शारदा शेख हिच्या जवळ सुरुवातीचे 15 दिवस बाळ होते.
मात्र त्यानंतर ते गायब होताच याप्रकरणी तिला ताब्यात घेत अधिक तपास केला असता तिने हे बाळ विकल्याची कबूली दिली. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी बाळ विक्री करणारी आई शारदा शेख आणि सहआरोपी आसीफअली फारूखी या दोघांना अटक केली.
तपासात आत्तापर्यंत आरोपी आईवडील आयूब खालीब आणि शारदा शेख या दोघांनी तिन मुले विकल्याचे कबूल केले आहे. 2 लाख 90 हजारांना या मुलींची विक्री झाली आहे.
दत्तक कायदा डावलून नियमबाह्य बाळांची विक्री केल्याप्रकरणी आईला अटक केली असली तरी मुलांचा बाप मात्र फरार झाला आहे. यामध्ये बाळ विकत घेणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल केला असून त्यांनी विकत घेतलेल्या दोन मुली पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पहिली मुलगी 90 हजार दुसरी मुलगी 2 लाखाला विकली होती. तिसऱ्या मुलाचा शोध सध्या नवी मुंबई पोलीस घेत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Paracetamol Uses : सावधान! 'या' पेयांसोबत पॅरासिटामोलची गोळी कधीही खाऊ नका, होईल वाईट परिणाम
- सलाम... सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये!
- Instagram Paid Subscriptions : इंस्टाग्राम आणणार नवं फिचर; रिल्स, व्हिडीओ बनवण्यासाठी सबस्क्रिप्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha