एक्स्प्लोर
नवी मुंबई महापालिका CBSE बोर्डाची शाळा सुरु करणार
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन परिमंडळ आहेत. या दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहे.
![नवी मुंबई महापालिका CBSE बोर्डाची शाळा सुरु करणार Navi Mumbai Municipal Corporation To Start Two Cbse Schools Latest Updates नवी मुंबई महापालिका CBSE बोर्डाची शाळा सुरु करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19215516/Navi-mumbai.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : लोकप्रतिनिधींच्या व नवी मुंबईकरांच्या वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनुसार नवी मुंबई महापालिकेतर्फे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आज महासभेत मंजूर करण्यात आला. महापालिका क्षेत्रात दोन परिमंडळ आहेत. या दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील पालककांकडून महापालिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात होती. या प्रकरणी महासभेनेदेखील याची दखल घेत या विषयावर सभागृहात चर्चा घडवून आणली होती. महापौर सुधाकर सोनवणे यांनी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच शिक्षण अधिकार्यांना त्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त रामास्वामी यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता महासभेत याला मजुरी घेण्यात आली.
शहरातील कष्टकरी माणूस शहराबाहेर जावू नये म्हणून त्यांच्या मुलांना सीबीएसई शिक्षण घेता यावे. पालिका शाळेत सीबीएसई बोर्ड आणल्याने गोरगरीब मुलांनाही जगात काय चालू आहे याचे त्वरित शिक्षण मिळाल्याने भविष्यात पालिकेचे विद्यार्थी जगाशी स्पर्धा करण्यास सज्ज होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)