एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबईतील दगडफेकीत जखमी तरुणाचा मृत्यू
नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा बळी गेला. दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोपरखैरणेमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मराठा मोर्चाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता.
उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. काल सकाळी त्याने उपचारांना साथ देणं सोडलं. सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचं उघड झालं आहे.
सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.
संबंधित बातम्या
नवी मुंबई : मराठा आंदोलनात हिंसा पसरवणारे 56 जण ताब्यात, अनेकजण परप्रांतीय
मराठा आंदोलनात अनोळखी चेहरे घुसल्याचा संशय- नरेंद्र पाटील
मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा
EXCLUSIVE : मराठा आरक्षण विशेष संवाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खास मुलाखत
मुंबई बंद स्थगित, शांततेचं आवाहन
मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार- मुख्यमंत्री
मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement