CIDCO : नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार होणार! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किंमतीत कपात, नवीन किंमती काय?
सिडकोने उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार असून म्हाडा नंतर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेल्या किंमतीमध्ये 10 टक्यांची कपात करण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात आला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 ऑक्टोबरला सिडकोच्या (Cidco) घरांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. यावेळेला लॅाटरी पद्धतीने घरे विकली जाणार नसून लोकांना थेट पैसे भरून घर बुक करता येणार आहे. म्हाडानंतर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेल्या किंमतीत 10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय. त्यामुळे घरांची किंमत थेट पाच ते सहा लाखांनी कमी होणार आहे.
सिडकोने उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार असून म्हाडा नंतर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या असलेल्या किंमतीमध्ये 10 टक्यांची कपात करण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेचाही अडीच लाखाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे थेट 5 ते 6 लाख रूपयांनी घरांच्या किंमती कमी होणार आहेत. 47 हजार घरांपैकी 25 हजार घरांची जाहिरात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने येत्या 2 ॲाक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. यावेळेला लॅाटरी पद्धतीने घरे विकली जाणार नसून लोकांना थेट पैसे भरून घर बुक करता येणार आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ घरे बांधण्यात आल्याने लोकांकडून चांगली पसंती दिली जाणार आहे.
परवडणारी घरे घेण्याची संधी
मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने (CIDCO House Lottery) रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. सिडकोने आतापर्यंत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी कधीच काढलेली नाही.
सिडकोच्या 'या' घरांसाठी निघणार लॉटरी
सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर , नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत. सध्या 67 हजार घरांचे काम सुरू असून 40 हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे. या लॉटरीमुळे नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
हे ही वाचा :
Sanjay Shirsat : सहा महिन्यांपूर्वी सिडकोत अपमान, आता अध्यक्ष होऊन आमदारकीची ताकद दाखवली : संजय शिरसाट