एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : सहा महिन्यांपूर्वी सिडकोत अपमान, आता अध्यक्ष होऊन आमदारकीची ताकद दाखवली : संजय शिरसाट

Sanjay Shirsat CIDCO President : ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार नाही, शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेवूनच पुढील पाऊल टाकणार असं संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई : सहा महिन्यापूर्वी  ज्या सिडकोत माझा अपमान एका अधिकाऱ्याने केला होता, त्याच सिडकोचा अध्यक्ष होऊन मी आमदाराची काय ताकद असते हे दाखवली असं वक्तव्य सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार असलेले संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर गुरूवारी त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी ABP माझाशी बोलताना त्यांनी सिडको महामंडळाचाच अध्यक्ष का झालो याबाबत मन मोकळे केले. 

संजय शिरसाट म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी सिडकोत जनतेच्या कामासाठी आल्यानंतर सिडको अधिकाऱ्याने आपला अपमान केला होता. त्याची सल मनात असल्याने एका आमदाराची  ताकद काय असते हे दाखवण्यासाठी सिडको अध्यक्षपद घेतलं. यापुढे सिडकोत गेल्या अनेक वर्षापासून अडकलेले धोकणात्मक निर्णय सोडवून जनतेला न्याय देणार.

सिडको अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला शिरसाटांचा नकार

ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार नाही, शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेवूनच पुढील पाऊल टाकणार असं संजय शिरसाट  म्हणाले. ऐरोली भागातील 13 हजार कोटी रूपयांची 80 एकर जागा एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव सर्वपक्षीय आमदारांनी उधळला होता. मात्र परत एकदा सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्ड मिटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला. 

ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मेगा सिटी गृहप्रकल्पाची इंत्यभूत माहिती समोर आणावी अशा सूचना त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय धरतीवर होणाऱ्या या मेगासिटीसाठी शहरातील तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचना घेऊनच सिडको पुढचे पाऊल टाकेल असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा: 

                                                                                                                                                                          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Embed widget