एक्स्प्लोर

National Anthem Contempt Case: राष्ट्रगीताचा अवमान प्रकरण; ममता बॅनर्जींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

National Anthem Contempt Case: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

National Anthem Contempt Case: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं (bombay high court) कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर दुपारी शिवडी दंडाधिकारी कोर्टानं यावर सुनावणी घेत कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना 28 एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जीं (mamata banerjee) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर नव्यानं सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिले आहेत. त्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. बुधवारी यावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यापुढे सुनावणी झाली. ज्यात ममता बॅनर्जींच्यावतीनं माजिद मेमन यांनी बाजू मांडली.

ममता बॅनर्जींविरोधातील याचिकेत काहीही तथ्य नाही. हे सारं प्रकरण केवळ अवहेलना करण्याकरता राजकीय हेतून दाखल केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच या मानहानीकारक प्रक्रियेपासून संरक्षण देण्याची ममता बॅनर्जींची हायकोर्टाकडे मागणी केली होती. मात्र जर सत्र न्यायालयानं याप्रकरणी नव्यानं सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत तर त्यांच्याविरोधात सध्या कोणतीच प्रक्रिया सुरू नाही, त्यामुळे दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाआधीच याप्रकरणी कोणताही दिलासा देता येणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं.
 
काय आहे प्रकरण?

कोरोनाकाळात मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी बसून राष्ट्रगीतचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार केली आहे. दंडाधिकारी न्यायालयानं 2 मार्च 2022 रोजी ममता बॅनर्जी यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी माजिद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्याच्या कारभार चालविण्यात त्या व्यग्र असल्यामुळे त्यांना खटल्याला अनुपस्थित राहण्यास मूभा आहे, असं निरीक्षण नोंदवून न्यायालयाने शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याचं समन्स रद्दबातल करत या याचिकेवर नव्यानं विचार करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलं होतं. विशेष न्यायालयानं हे समन्स रद्द करताना प्रकरण पुन्हा दंडाधिकार्‍यांकडे पाठवायला नको होतं, असा दावा या याचिकेतून केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 29 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..Mahakumbh Mela Stampede : पत्नी आणि नातेवाईक हरवले..,मी पडलो, माझ्या अंगावरुन लोक गेलेCM Yogi Adityanath On stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
Embed widget