एक्स्प्लोर

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स

Narendra Modi Mumbai BKC Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारत 40 वर्षांनंतर IOC सत्राचे यजमानपद भूषवत आहे. 

LIVE

Key Events
Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स

Background

Narendra Modi Mumbai BKC Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं (International Olympic Committee) अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात. 

आशियाई स्पर्धांनंतर IOC सत्राबाबत उत्सुकता 

भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे. IOC चे 86 वं अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.

क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश 

यंदाचं 141 वं IOC चं अधिवेशन भारतात आयोजित केलं जात आहे. जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक आहे. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

आयओसी अॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकतं. ऑलिम्पिक चळवळ खरोखरंच भारतातील तरुणांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रेरित करू शकते. तरुण समाजाला नवी दिशा देण्यासाठीही सकारात्मक भूमिका बजावू शकतात. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, ज्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळ, खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

दरम्यान, भारतात होणारं IOC चं 141 वं सत्र जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि ऑलिम्पिकच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी देशाच्या समर्पणाचं प्रतीक आहे. हे सत्र खेळाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल.

20:38 PM (IST)  •  14 Oct 2023

Narendra Modi : खेळ जगाला जोडण्याचं सशक्त माध्यम, ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत नरेंद्र मोदींचा विश्वास

आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर चागली कामगिरी करत आहे. तरुणांनी देखील चांगली कामगिरी केलीय. मला विश्वास आहे भारताला आयओसीचे सहकार्य मिळेल. खेळ फक्त मेडल जिकण्यासाठी नसतात तर त्या माध्यमातून सर्वांची मने जिकता येतात. खेळ जगाला जोडण्याचे एक सशक्त माध्यम आहे. 

20:35 PM (IST)  •  14 Oct 2023

Narendra Modi : खेळात कुणी लूजर नसतो, जिंकणारा आणि शिकणारा असतो, ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन करताना मोदींचे वक्तव्य

40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे आयोजन होतंय. काही वेळेपूर्वी भारताने अहमदाबा मध्ये देशातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर विजय मिळवला. मी या विजयाबद्दल संघाचं आभार मानतो. खेळात कोणी लूजर नसतो तर जिकणारा आणि शिकणारा असतो. रेकॉर्ड केला तरी त्याचे स्वागत केलं जातं. आमचे सरकार खेळाला महत्व देण्यासाठी काम करत आहे. 

17:44 PM (IST)  •  14 Oct 2023

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत. 

17:42 PM (IST)  •  14 Oct 2023

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल

 Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोहचले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget