एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसकडून राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न, दिल्लीला बोलावणं!
मुंबई: नारायण राणे काँग्रेस सोडण्याच्या बातम्या सुरु झाल्यानं आता काँग्रेसनं राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केला आहेत. त्यासाठी राणेंना काँग्रेस नेतृत्वानं तातडीनं दिल्लीला बोलवलं आहे.
दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे नारायण राणेंची समजूत काढणार आहेत. नारायण राणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं राणेंना रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जाते आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरुन आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह राणेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. मात्र, राणेंनी या भेटीचं वृत्त फेटाळलं होतं.
अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला होता.
“मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना,” अशी कोपरखळी नारायण राणेंनी मारली होती. “भाजपकडून ऑफर येते, मात्र त्यावर अजून विचार केलेला नाही. भाजपच्या ऑफरला मी नकारही दिला नाही आणि होकारही दिला. कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही,” असं नारायण राणे म्हणाले होते.
अहमदाबादमध्ये नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसत होतं.
‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. मात्र, राणेही त्याच दिवशी अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement