एक्स्प्लोर

नायर रुग्णालयाचं शतक! शतक महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंनसिंगचा फज्जा

मुंबईतील नायर रुग्णालयाला (Nair Hospital) 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शतक महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंनसिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.

मुंबई : शहरातील नायर रुग्णलयाला (Nair Hospital) आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमात व्यासपीठावर सोशल डिस्टिंनसिंगचा (Social Distancing) विसर पडल्याचे दिसून आले. मंत्र्यासह प्रशासनातील अधिकारी, महापौर मिळून 20 जण एकाच वेळी स्टेजवर होते. त्यामुळे लोकांना वारंवार कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
विचार करतोय की मी काय बोलावे.. मी फक्त कौतुक, शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. या संस्थेचं सगळं काम पाहिलं आहे. हा प्रवास थक्क करणारा होता. जिद्द असली तर काय होऊ शकते? याच उदाहरण ही संस्था आहे, असं स्तुती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. या व्यासपीठावर आमचीच गर्दी जास्त म्हणजे राजकारणी मंडळींची आहे, डॉक्टरांची कमी आहे. मंदिर बंद आहे मग देव कुठे आहे तर देव प्रार्थना स्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आहेत. मुंबई मॉडेलचं मुख्यमंत्री म्हणून माझं कौतुक होतंय. पण, याचे खरे मानकरी तुम्ही डॉक्टर आहात. मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा जॉईन झाल्यावरच धारावीत गेले होते. धारावी आपण संकटातून बाहेर काढली.

मुंबईतल्या नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण राबवणार

100 कोटी रुपये निधी जाहीर करतो : मुख्यमंत्री
100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ आली होती, तेव्हा मास्क घालणे हा एकमेव पर्याय होता. या संस्थेचं वेगळेपण म्हणजे जसे या संस्थेचा वय होतंय तशी ही संस्था तरुण होत चालली आहे. कारण ही काळानुसार पुढे जातीये. ही निर्जीव इमारत नाहीये, तर सगळ्यांनी मिळून या इमारतीत जीव ओतलाय आणि हिला सजीव केलीय. नायर रुग्णालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 100 कोटी रुपये निधी जाहीर करतो.रुग्णालयाला आता महापालिका आणि राज्य सरकारकडून निधी तर मिळतोच. आता दोन्ही खिसे माझेच आहेत. त्यामुळे दोन्ही खिसे बघून हा निधी या रुग्णालयासाठी देत आहोत. जिनोम सिक्वेसिंग लॅब सुरू झाली आहे. आता पुन्हा दुसऱ्या लाटेची पुनवृत्ती नको म्हणून ही लॅब महत्वाची आहे. आज जे मी या संस्थेत आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो. यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाली. एकाचवेळी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी स्टेजवर उपस्थित राहिल्याने गर्दी झाली होती. यात मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, आमदार यामिनी जाधव, नायर डिन रमेश भारमल, नगरसेविका संध्या जोशी, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सभागृह नेते यशवंत जाधव, नगरसेवक गीता गवळी, आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, नगरसेवक दत्ता पोंगडे, नगरसेवक स्वप्नील टेमकर आदी लोक उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget