एक्स्प्लोर

Municipal Elections 2025: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका?; आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक

Municipal Elections 2025: राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे.

Municipal Elections 2025: राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections 2025) घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते. 

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या  बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. (Maharashtra Election 2025)

सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज बैठक- (Maharashtra ECI Meeting)

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित असतील. तर दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु- (Municipal Elections 2025)

राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या  बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. 

प्रारुप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452  हरकती सूचना- (BMC Election 2025)

एका दिवसात एकूण 1958 हरकती सूचना नोंदी मुंबई महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या आहेत. 3 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. तर अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहिर करण्यात आलेल्या प्रारुप मतदान यादीवर बुधवार 3 डिसेंबरपर्यंत 7452 हरकती सूचना नोंद झाल्या आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Zilla Parishad Election Maharashtra 2025: 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली; आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दोन टप्प्यात होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

Embed widget