एक्स्प्लोर
विलेपार्ल्यातील अवैध बांधकामप्रकरण, मनपा आयुक्तांचा विनाशर्त माफीनामा
मुंबई: महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी शुक्रवारी विनाशर्त माफीनाम्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. विलेपार्ले येथील नगरसेवक बिनिता वोरा यांचे पती मेहूल यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर केलेले अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश देऊनही न तोडल्याने न्यायालयाने पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
आदेश देऊनही कारवाई न झाल्याने न्यायालयाच्या अवमानतेची नागरी व फौजदार कारवाई का करु नये याचे प्रत्युत्तर मेहता यांनी सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मेहता यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
मेहूल यांचा विलेपार्ले येथे कुंज विहार बंगला आहे. तेथे त्यांनी अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप करत शिवसेनेचे जितेंद्र जानावळे यांनी याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जून महिन्यात दिले होते.
पण कारवाई करण्याऐवजी पालिकेने हे बांधकाम नियमित केल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने मेहता यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement