Mumbai Police : फडणवीस यांच्या मर्जीतील देवेन भारती यांना मुंबईत मोठी जबाबदारी? नवीन पदाच्या निर्मितीची शक्यता
Mumbai Police : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी समजले जातात.
Mumbai Police : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी (Mumbai Special Commissioner of Police) नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्याने याबाबत 'एबीपी माझा'ला माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष आयुक्तपदाची निर्मिती केली जात आहे. याबाबतचा आदेश लवकरच जारी केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी अनुकुल असल्याच समजतं. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी समजले जातात.
फडणवीस सरकारच्या काळात सर्वात प्रभावी अधिकारी
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले. मग 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात IPS अधिकार्यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं.13 डिसेंबर 2022 रोजी देवेन भारती यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
फडणवीस गृहमंत्री बनल्यानंतर देवेन भारतींना नवी जबाबदारी देण्याची चर्चा
फडणवीस यांनी गेल्या वर्षी गृहखात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. रश्मी शुक्ला यांना अँटीकरप्शन विभागामध्ये मुंबईच्या सीपी किंवा डीजी म्हणून परत आणण्याचा प्रस्ताव होता. कारण डिसेंबरमध्ये रजनीश सेठ यांची डीजीपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पद रिक्त होतं. त्यानंतर विशेष सीपी म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, फोन-टॅपिंग प्रकरणामध्ये कथित भूमिकेबद्दल शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज न्यायदंडाधिकार्यांनी फेटाळला. यानंतर रश्मी यांना मुंबईत परत आणण्याच्या हालचाली सध्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता देवेन भारती यांना मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
विवेक फणसळकर यांना हटवण्याचा विचार नाही
दरम्यान मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांनी नियुक्ती जरी झाली तरी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही त्यांच्या पदावरुन हटवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. त्यामुळे देवेन भारती यांना मुंबईच्या विशेष आयुक्तपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
VIDEO : Special Commissioner of Police Mumbai : मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारतींची शक्यता