एक्स्प्लोर

मुंबईकरांची घरखरेदी महागणार, स्टॅम्प ड्युटीत वाढ करणारे विधेयक मंजूर

विधेयकामुळे स्टॅम्प ड्युटीत एक टक्का वाढ होणार आहे. मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे. मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी सहा टक्क्यांवरून आता सात टक्के होणार आहे. मालमत्तेच्या विक्री, दान आणि गहाण ठेवण्यासाठी देण्यात येणार्‍या स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा घर खरेदी करताना खर्च वाढणार आहे.

मुंबई : मुंबईकरांची घरखरेदी आता महाग होणार आहे. स्टॅम्प ड्युटीत वाढ करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. आज अधिवेशनात मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक चर्चा न करता गोंधळातच मंजूर झाले.
या विधेयकामुळे स्टॅम्प ड्युटीत एक टक्का वाढ होणार आहे. मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे. मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी सहा टक्क्यांवरून आता सात टक्के होणार आहे. मालमत्तेच्या विक्री, दान आणि गहाण ठेवण्यासाठी देण्यात येणार्‍या स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा घर खरेदी करताना खर्च वाढणार आहे.
इमारतीतील खरेदी-विक्री, भाडेतत्त्वावरील करार, बक्षीस पात्र करारनामा, गहाण ठेवलेली कागदपत्रे याकरिता स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता एक टक्का वाढ झाल्यामुळे स्टॅम्प ड्युटी सात टक्के होणार झाली आहे. नोटबंदीनंतर मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण असताना मुंबईत स्टॅम्प ड्युटीत होणार्‍या वाढीमुळे या धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका कायदा 2018 मध्ये  स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरविण्यासाठी दुसर्‍यांदा बदल करण्यात येत आहेत. मुंबई शहरात झपाट्याने वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतीने  मोनो, मेट्रो रेल, फ्री वे, सीलिंक रोड यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत.  स्टॅम्प ड्युटीचा वाढीव भार हा या विकास प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे.
देशात अन्य राज्यांचा स्टॅम्प ड्युटीचा दर हा तीन टक्के ते 10 टक्के असा नियम असला तरी, प्रत्येक राज्य हे किती स्टॅम्प ड्युटी असावी याबाबत निर्णय घेत असते.  स्टॅम्प ड्युटी किती असावी यासाठी राज्य सरकारने निकष ठरविले आहेत. ज्या जागेचा व्यवहार होणार असेल तेथील रेडिरेकनरचा दर किंवा, करारनाम्यानुसार  खरेदी-विक्रीचा दर अधिक असेल तर तो ग्राह्य धरला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Embed widget