एक्स्प्लोर
एक्स गर्लफ्रेण्डचा साखरपुडा, मुंबईत तरुणाची आत्महत्या
मुंबई : पहिल्या प्रेयसीच्या साखरपुड्याचा धक्का पचवू न शकल्याने मुंबईत एका तरुण बिझनेसमनने टोकाचं पाऊस उचललं. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन 24 वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली.
पवनजीत सिंग कोहली असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडीलही बिझनेसमन आहेत. रविवारी सकाळी पवनजीत घरी परत न आल्यामुळे वडील जसपाल सिंग कोहली यांनी खार पोलिसात मिसिंगची केस नोंदवली.
शनिवारी संध्याकाळी पवनजीतच्या एक्स गर्लफ्रेण्डचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे तो निराश असल्याची माहिती त्याच्या एका मित्राने पोलिसांना दिली. याच मित्रासोबत तो आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी करत होता.
समुद्रात उडी मारल्यानंतर सोमवारी सकाळी वांद्र्याच्या बँडस्टॅण्डजवळ पवनजीतचा मृतदेह वाहत आला, तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
कोहली कुटुंबीय पाली हिलमधील एका सी फेसिंग फ्लॅटमध्ये राहतं. पवनजीतचे वडील जसपाल सिंग कोहली यांचा टायर्सचा व्यवसाय आहे. तर पवनची मोठी बहीण विवाहित आहे.
'पवनजीत शनिवारी रात्री 12.30 वाजता मित्रांना भेटण्यासाठी घराबाहेर पडला. वरळीतील हॉटेलमध्ये रात्री पार्टी केल्यानंतर त्याने घरी परतण्यासाठी कॅब बुक केली.' अशी माहिती जसपाल यांनी दिली. जसपाल यांनी लेकाला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पवनजीतचा फोन आणि पाकिट घरीच असल्याचं त्यांच्या नंतर लक्षात आलं.
पोलिसांनी संबंधित टॅक्सीचालकाला शोधून काढलं. 'पवनजीतने सी लिंकवर आपल्याला टॅक्सी थांबवायला सांगितली. मात्र हे अवैध असल्याचं सांगत आपण नकार दिला. तेव्हा मला मळमळत असून टॅक्सी न थांबवल्यास टॅक्सीतच उलटी करेन, असं सांगितल्याने आपण टॅक्सी थांबवली. मात्र त्याने टॅक्सीतून
उतरताच धावत जाऊन समुद्रात उडी मारली.' अशी माहिती टॅक्सीचालकाने दिली आहे. 2012 पासून सी लिंकवरुन उडी मारुन आत्महत्या करण्यांची संख्या 12 वर पोहचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement