Mumbai Weather News : मुंबईत आज 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास
Mumbai Weather News : यंदा मुंबई शहरात डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा 2-3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Mumbai Weather News : मुंबई शहरातील वातावरणात सध्या सातत्याने बदल (Climate change) जाणवत आहेत. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणामुळे तब्येतीवर परिणाम होत आहे. सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदल्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम (Impact on health) होताना दिसत आहे. मुंबई शहरातील तापमानातील बदलांमुळे (Mumbai Climate Change) लोकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसह वृद्धांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास सुरु झाला आहे. मुंबईत आज 34 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सलग दोन दिवस मुंबईतील कमाल तापमान देशातील सर्वाधिक अंश सेल्सिअस राहिले. काल मुंबईतील तापमान 35.9 अंश सेल्सिअस होते.
मुंबईत डिसेंबर महिन्यात 2-3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
यंदा मुंबई शहरात डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा 2-3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 1987 मध्ये 38 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. दरम्यान, डिसेंबर महिन्यात कमाल सरासरी तापमान 35 अंशांपर्यंत जाताना बघायला मिळत असतं. सोबतच किमान तापमानात देखील घट होत असते. ख्रिसमसनंतर पुन्हा एकदा किमान तापमान घटण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मुंबईकरांना सर्दी, खोकल्याचा त्रास
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी मुंबई शहरातही सलग सहा ते सात दिवस हवेच्या गुणवत्तेत वाढ झाली होती. मुंबईतील अनेक भागात एक्यूआय सरासरी 300 हून अधिक नोंदविण्यात आला होता. त्यामुळे अनेक मुंबईकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. मात्र, आता हिवाळ्यात तापमान 35 अंशांपर्यंत तापमान जात असल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला, शरीर दुखणे यांसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. याचा परिणाम लहान मुलांच्याही आरोग्यावर होतोय.
मागील तीन दिवसांत किती होतं मुंबईतील कमाल तापमान?
16 डिसेंबर - 35.6 अंश सेल्सिअस
17 डिसेंबर - 35.9 अंश सेल्सिअस
18 डिसेंबर - 33.6 अंश सेल्सिअस
महत्त्त्वाच्या बातम्या :
Measles Disease : चिंताजनक! राज्यात आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू; तर 16,597 संशयित रूग्ण