Viral Video: सीएसएमटी स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, माथेफिरु चक्क ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून बसला
Viral Video : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवर आज एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी एक व्यक्ती चक्क रेल्वे स्टेशनवर असलेला लोखंडी खांबावर चढला होता.
Viral Video : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवर (Chhatrapati Sambhaji Maharaj Terminus) आज एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी एक व्यक्ती चक्क रेल्वे स्टेशनवर असलेला लोखंडी खांबावर चढला होता. खांबावर चढल्यानंतर हा व्यक्ती आत्महत्या करण्याची धमकी देत होता, असं सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती जेव्हा लोखंडी खांबावर चढला होता, तेव्हा त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या अनेकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हे व्हिडीओ (Viral Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या (Csmt Railway Station) प्लॅटफॉर्म 9 वर ओव्हरहेड वायरच्या खांबावर हा व्यक्ती चढला होता. यावेळी त्याने आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली. खांबावर हा व्यक्ती चढल्यानंतर त्याला पाहायला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. हा व्यक्ती खांबावर चढल्यानंतर रेल्वे स्थानक Csmt Railway Station) प्रशासनाने त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून ओव्हरहेड वायर मधील विद्युत प्रवाह बंद केला होता. यानंतर त्याला खाली उतरवण्याची अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. मात्र हा व्यक्ती खाली उतरण्यास तयार नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून बसला होता. हा व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली उतरवले आहे. #ViralVideo #CSMT #Mumbai pic.twitter.com/CsJTC72HMI
— Satish Kengar (@kengar_satish) March 25, 2023
या व्यक्तीला खाली येण्यासाठी बऱ्याचदा सागितल्यानंतरही तो खाली येत नव्हता, यानंतर शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतः वर चढून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र यानंतर या व्यक्तीने चक्क रेल्वेवर Csmt Railway Station) उडी मारली. यात त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो खांबावर का चढला होता, याबाबत त्याची चौकशी केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी: