मुंबई विद्यापीठाचा 2021-22 या वर्षाचा 724 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेत सादर
मुंबई विद्यापीठाचा 2021-22 या वर्षाचा 724 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यात आला आहे.
मुंबई : विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रीत आणि सर्वसमावेशक असा 2021-22 सालचा रुपये 724 कोटीचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत सादर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये 78 कोटी 53 लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देत विविध भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस, शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातील उपक्रम), स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, सिंधुदुर्ग उप परिसर, इन्क्युबेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डिजीटल लायब्ररी, डिजीटल युनिव्हर्सिटी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापना, विद्यापीठ उप परिसर विकास, पालघर उपकेंद्र, सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज, दूर्गम भागातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू सेल यासाठी खास तरतूद या बजेटमध्ये आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या सोहळ्याच्या नाविण्यपूर्ण उपक्रम, विद्यापीठ मुद्रणालयाचे सक्षमीकरण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, स्कूल ऑफ परफॉर्मिंट आर्ट, राष्ट्रीय सेवा योजना, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्स, स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स, सेंटर फॉर हिंदू फिलॉसॉफीकल स्टडीज आणि नारायण गुरू एन्डॉवमेंट अशा वैविध्यपूर्ण आणि नाविण्यपूर्ण उपक्रमांवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रीत अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत सादर करण्यात आला.
याबरोबरच 2021-2022 या वर्षामध्ये नियोजित व अपूर्ण राहिलेल्या बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आले असून यामध्ये हिंदी व उर्दू भाषा भवन, खेळांचे इनडोअर संकुल, बाबू जगजीवन राम मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल, तृतीय व चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल व सामुदायिक सभागृह, तत्वज्ञान केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन, स्कुल ऑफ लँग्वेजेस इमारत (दुसरा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (दुसरा टप्पा), चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI