एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे अर्ज आता ऑनलाईन
पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे अर्ज ऑनलाईन केल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात न जाता, थेट ऑनलाईन अर्ज करु शकतात, त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे

फोटो : गेट्टी इमेज
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 2019 च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठ जाहीर करत आहे. परीक्षांच्या निकालानंतर काही महत्त्वाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे अर्ज आजपासून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. ही सुविधा प्रथमच विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या बीकॉमच्या सहाव्या सत्राच्या चार विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे अर्ज आजपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येत आहेत. याची अखेरची तारीख 18 जून 2019 असून याचे शुल्कही ऑनलाईन स्वीकारण्यात येत आहे. हे ऑनलाईन अर्ज उन्हाळी सत्राच्या जास्त संख्या असलेल्या परीक्षेसाठी सध्या लागू करण्यात आलेले आहेत. 2019 च्या हिवाळी सत्रापासून संपूर्ण परीक्षेचे पुनर्मूल्यांकन आणि छायांकीत प्रतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mu.ac.in वर Exam & Resuls →Examination→Application for Revaluation / Photocopy या लिंकवर उपलब्ध आहेत. पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीचे अर्ज ऑनलाईन केल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात न जाता, थेट ऑनलाईन अर्ज करु शकतो. यामुळे विद्यापीठाकडे हे अर्ज तात्काळ येतील आणि विद्यापीठ या अर्जावर प्रक्रिया करुन पुनर्मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांसाठी ऑनलाईन ओएसएमद्वारे उपलब्ध केले जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतीसाठी अर्ज केला असेल, त्या विद्यार्थ्याच्या ईमेलवर त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाठवली जाईल. सध्या महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेतात आणि ते अर्ज एका सीडीमध्ये विद्यापीठाकडे पाठवतात, यामध्ये वेळ जातो. निकाल लागल्यापासून तो पेपर शिक्षकांना पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी जातो. तो कालावधी या ऑनलाईनमुळे पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच महाविद्यालयाचा ताणही यामुळे कमी होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























