एक्स्प्लोर
छेडछाड करणाऱ्या तरुणाची मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण
आपण राज्य शासनाच्या व्हिजिलन्स विभागात कार्यरत असल्याचा दावा संबंधित व्यक्ती करत होता.
मुंबई : मुंबईत पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार अनेक वेळा समोर येत आहेत. छेडछाड करणाऱ्या टवाळखोराची एका तरुणीच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची सुरु असताना या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच त्याने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मुलुंडमध्ये बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
महिला स्वच्छतागृहाजवळ उभं राहून तरुणींना त्रास देणाऱ्या टवाळखोराला जाब विचारण्यास एका तरुणीचे नातेवाईक आले होते. या प्रकरणात एका वाहतूक पोलिसाने हस्तक्षेप केला, तेव्हा छेडछाड करणाऱ्याने वाहतूक पोलिसालाच मारहाण केली, असा आरोप आहे.
आपण राज्य शासनाच्या व्हिजिलन्स विभागात कार्यरत असल्याचा दावा आरोपी करत होता. स्वच्छतागृहाजवळ येणाऱ्या तरुणींकडे ही व्यक्ती मोबाईल क्रमांक मागत असे आणि मी तुम्हाला जॉब देतो, असं सांगून त्रास देत असल्याचा आरोप आहे.
एका तरुणीला हा इसम त्रास देत असताना तिचे नातेवाईक त्याला जाब विचारण्यासाठी आले होते. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेल्या विलास कांबळी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक या व्यक्तीने विलास कांबळी यांनाच मारहाण करत शिवीगाळ सुरु केली. आरोपीला अखेर मुलुंड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement