(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunday Street : मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी 'संडेस्ट्रीट'; योग, खेळ आणि मनोरंजनासाठी पोलिसांची संकल्पना
Mumbai Sunday Street : आज मरीन ड्राईव्ह येथे 'संडेस्ट्रीट' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार, पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली.
Mumbai Sunday Street : मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावं तसेच त्यांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यासारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरता मुंबई पोलिसांनी 'संडेस्ट्रीट' (Mumbai Sunday Street) संकल्पना राबवण्यात ये आहे. 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई पोलीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली आहे. आज मरीन ड्राईव्ह येथे 'संडेस्ट्रीट' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला आज मरीन ड्राईव्ह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार तसेच पोलीस सह आयुक्त ( का.व.सु ) विश्वास नांगरे पाटील यांनी हजेरी लावली.
एकूण 13 ठिकाणी 'संडेस्ट्रीट'
आज एकुण 13 ठिकाणी 'संडेस्ट्रीट' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचा उद्देश मुंबईकरांना घराबाहेर पडून मजा करता यावी, खेळ आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे.
अत्रिनेता अक्षय कुमारनं दिली 'ही' प्रतिक्रिया
अत्रिनेता अक्षय कुमारनं या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, 'आज या ठिकाणी येऊन मला आनंद झाला. कोविड काळात सर्वत्र शांतता होती. यानंतर दिसणार हे चित्र दिलासादायक आहे. ही संडेस्ट्रीट कल्पना कायम राहावी. केवळ रविवारीचं नाही तर दररोज व्यायाम करावा. सर्व लोकांसोबत चांगले संबंध जोडण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. आपल्या पोलीस दलातही अनेक कलाकार आहेत.'
काय आहे 'संडेस्ट्रीट' संकल्पना?
धक्काधक्कीच्या, व्यस्त जीवनातून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळावा. त्यांचा तणाव दूर व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांकडून 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यावेळी मुंबई रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत, यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतात. आज मरीन ड्राइव्ह या ठिकाणी दिलीप वळसे पाटील, अभिनेता अक्षय कुमार आणि पोलीस सह आयुक्त ( का.व.सु ) विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांसह संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला.