वर्सोव्यात अज्ञातांकडून शिंदेंच्या सेनेच्या कार्यालयावर दगडफेक, आरोपींचा शोध सुरू
गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विभागीय कार्यालय एकनाथ भवनाच्या उद्घाटन होणार होता. मात्र आज दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात इसमांकडून शिंदे गटाचे एकनाथ भवन या कार्यालयावर दगडफेक करण्यात आला आहे.
मुंबई: वर्सोव्यात (Versova) उद्घाटनाआधीच शिंदे (Eknath Shinde) गटाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडले आहे. दगडफेकीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्याकडून 'एकनाथ भवन' विभागीय कार्यालय उभारण्यात आला आहे. आज गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार होते. मात्र उद्घाटनाआधीच कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय.
गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विभागीय कार्यालय एकनाथ भवनाच्या उद्घाटन होणार होता. मात्र आज दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात इसमांकडून शिंदे गटाचे एकनाथ भवन या कार्यालयावर दगडफेक करण्यात आला आहे. वर्सोवामध्ये शिंदे गटाचा कार्यालयावर दगडफेकीची घटना घडल्यामुळे परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचे शोध घेत आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
वर्सोवा पोलिसांनी दोन ते तीन टीम बनून परिसरात असलेले सीसीटीव्ही आणि दिव्या ताब्यात घेऊन आरोपीचे शोध घेत आहे. शिंदे गटाचा आरोप आहे ठाकरे गटाचा कार्यकर्ता एकनाथ भवन कार्यालयावर दगडफेक केला आहे. मात्र आरोपी अटक झाल्यानंतर स्पष्ट होईल कोणी हा दगडफेक केला आहे. परिसरात तणावाचा वातावरण आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.