एक्स्प्लोर

अंगडिया खंडणी प्रकरणी फरार डीसीपी सौरभ त्रिपाठींना दिलासा नाही, न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारला

अंगडिया व्यवसायिकांकडून दरमहा 10 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन करण्यात आलं आहे. 

मुंबई: अंगडिया खंडणी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं कोणताही दिलासा न देता पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी त्रिपाठी यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊनच त्यांची चौकशी करावी लागेल असं सरकारी पक्षानं स्पष्ट केल्यामुळे न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी सौरभ त्रिपाठींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आपल्याला वरीष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आल्याचा दावा डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी केला होता. तसेच अंगडिया यांचा व्यवहारही बेकायदेशीरपणेच चालतो, त्यामुळे त्यांनी आपल्याविरोधात तक्रार देणं हा चोरानंच त्याची घरी चोरी झाली असा आरोप करण्यासारखं असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टापुढे केला होता. याशिवाय ओम वंगाटे हेच यामागचे सूत्रधार आहेत. त्यांनीच या अंगडियांना धमकावून त्यांच्याकडनं जबरदस्ती वसूली केली आहे असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?
डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे आणि एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अटक केलेल्या अधिकार्‍यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची किंवा आयकर विभागाला त्यांच्या बेकायदेशीर कृतींबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. पुढील तपासांत त्रिपाठीविरोधातही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई म्हणून विभागीय चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला डीसीपींच्या निलंबनासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते सेवेवर गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआयय़ू) त्रिपाठी यांना फरार घोषित केलेलं आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर 20 मार्च रोजी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर स्वाक्षरी केली.

कोण आहेत सौरभ त्रिपाठी? 
त्रिपाठी, हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून एमबीबीएस आणि एमडी (त्वचाविज्ञान) पदवीधर असून त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी डीसीपी झोन 4, वाहतूक पोलिसात डीसीपी, डीसीपी एसबी (1) म्हणून पदभार सांभाळला आहे, त्यापूर्वी अहमदनगरचे एसपी देखील होते. याप्रकरणानंतर त्यांची डीसीपी झोनमधून डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती परंतु फरार असल्यामुळे त्यांनी हा पदभार स्वीकारला नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 

ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget