एक्स्प्लोर

मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणी मालकांना दिलासा, सर्व आरोपातून दोषमुक्त

2017 च्या मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणात मालकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने रमेश गोवानी आणि रवी भंडारी सर्व आरोपांतून दोषमुक्त केलं आहे. मात्र इतर आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालणार आहे. यात 'मोजोस ब्रिस्ट्रो' आणि 'वन अबव्ह' चे मालक, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई : 2017 च्या कमला मिल अग्नितांडव प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी आणि रली भंडारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं आहे. या दोघांविरोधात एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, इतरांच्या मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात इतर आरोपींची याचिका फेटाळून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

मात्र घडलेल्या दुर्घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा या दोघांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. ही घटना घडली तेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. तिथल्या दैनंदिन कामकाजाशी आपला काहीही संबंध नाही. 'वन अबव्ह' आणि 'मोजोस ब्रिस्ट्रो' या दोन्ही जागा 5 वर्षांच्या भाडेत्त्वावर दिलेल्या होत्या. या जागेत सुरु असलेल्या पब्ज रेस्टॉरंटसाठीचे सर्व परवाने हे महापालिका प्रशासनाने दिलेले आहेत. मद्यसेवनाचे परवाने राज्य सरकारने दिलेले आहेत. अग्निसुरक्षा संबंधिचा परवानाही मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेशी आपला काहीही संबंध नाही असा दावा गोवानी आणि भंडारी यांनी केला होता.

यात मोजोस ब्रिस्टोचे मालक-संचालक युग पाठक, युग टुली, वन अबव्हचे मालक-संचालक जिगर संघवी, क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एमआरटीपी अंतर्गत महापालिकेच्या तक्रारीवरुन हा एफआयआर दाखल केला होता. तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अबव्हचा मॅनेजर केविन बावा आणि लिस्बन लोपेज, वरळी अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, संदीप शिंदे आणि महापालिकेच्या 'जी' वॉर्डचे अधिकारी दिनेश महाले यांच्याविरोधात सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्निविरोधक यंत्रणेचा वापर न करणं या आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावर हा खटला चालवण्यात येणार आहे.

29 डिसेंबर 2017 च्या रात्री कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस ब्रिस्टो या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Embed widget