एक्स्प्लोर
Advertisement
डिझेल आणि टोलमुळे 'स्कूल बस'ची फी वाढणार?
स्कूल बस ओनर्स असोसिएशनची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : इंधनाच्या वाढत्या दराचा फटका स्कूल बसला बसण्याची शक्यता आहे. कारण डिझेल आणि टोलमुळे 'स्कूल बस'च्या फीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत.
डिझेलचे वाढते दर यांच्यासोबतच ठिकठिकाणी भरावे लागणारे टोल हे स्कूल बसच्या शुल्कवाढीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने चार टोलनाक्यांवर स्कूल बसला सवलत दिली नाही, तर या परिसरातील सध्याच्या स्कूल बस शुल्कात प्रति विद्यार्थी 500 ते 600 रुपये वाढ करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
स्कूल बस ओनर्स असोसिएशनची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने स्कूल बसना टोलमुक्ती द्यावी, सबसिडी द्यावी अन्यथा प्रति विद्यार्थी 500 ते 600 रुपयांची भाडेवाढ करावी लागेल, असं युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement