मुंबईत शाळा सुरू होऊनही शालेय इमारतींचा कोविड सेंटर, लसीकरण केंद्र म्हणून वापर सुरूच!
कोविड सेंटर, लसीकरण केंद्र म्हणून उपयोगात असणाऱ्या शालेय इमारती या मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे असून त्या तातडीने हस्तांतरित करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे.

Mumbai School Covid Vaccination Center : मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळा प्रशासनाने प्रयत्न करून सर्व तयारी केली आणि शाळांचे वर्ग सुरू केले. मात्र, मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊन 10 दिवस होत आले तरी 25 शाळेच्या इमारतीचे वापर सेंटर आणि लसीकरण केंद्र म्हणून होत आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणारे साधारपणे 10 हजाराच्या आसपास विद्यार्थी हे शाळा सुरू होऊन सुद्धा प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून वंचित आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बीएमसी शाळांचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्यात येत होता. कोविड रुग्णांना किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगिकरणात ठेवण्यासाठी या शाळांचा वापर करण्यात येत होता. शिवाय लसीकरण मुंबईमध्ये सुरू झाल्यानंतर बी एम सी चे काही शाळांचा लसीकरण केंद्र म्हणून सुद्धा वापर करण्यात येतो होता. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, ज्या ठिकाणी शाळांचा लसीकरण केंद्र किंवा कोविड सेंटर म्हणून वापर केला जात आहे, अशा शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून शैक्षणिक वातावरण निर्माण करून त्या शाळा सुरू करण्यात याव्यात अशा सूचना आहेत.
त्यानुसार अजूनही मुंबई महापालिका शिक्षण विभाग या शाळा हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. साधारणपणे पंचवीस शाळा इमारती या अजूनही सुरू झाल्या नाहीत ज्यामध्ये प्रत्येक शालेय मराठी 400 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यानुसार दहा हजार विद्यार्थी अजूनही प्रत्यक्ष शाळेत शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा आलेले नाही.
यातील काही शालेय इमारती या मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे असून त्या तातडीने हस्तांतरित करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. शिवाय शाळा चांगली झाल्यानंतर पर्याय जागांबाबत सुद्धा नियोजन मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. ज्या शाळांमध्ये लसीकरण सुरू आहे त्या शाळांमध्ये लसीकरणासाठी प्रवेश आणि शाळांसाठी प्रवेशद्वार वेगळे करून शाळा सुरु करण्याचा प्रयत्न असेल.
मुंबई कोणत्या भागात किती शालेय इमारतींचा वापर कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्रासाठी केला जातोय -
मुंबईत शहर -
कोविड सेंटर - 2 शाळांच्या इमारती
लसीकरण केंद्रासाठी - 7 इमारती
पूर्व उपनगर -
कोविड सेंटर साठी - 1 शाळांच्या इमारती
लसीकरण केंद्रासाठी - 9 शाळांच्या इमारती
पश्चिम उपनगर
लसीकरण केंद्रासाठी - 6 इमारती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी करताय?, BMC चे नियम एकदा वाचाच
ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
IRCTC : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात जाताय? 'या' ट्रेनचे मिळेल कन्फर्म तिकिट!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
