एक्स्प्लोर

IRCTC : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात जाताय? 'या' ट्रेनचे मिळेल कन्फर्म तिकिट!

special train for goa : नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गोवा येथे जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Special train for Goa to Panvel : नाताळ (Christmas 2021) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी  (New Year 2022) कोकण अथवा गोव्यात जाण्याचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही खास ट्रेन चालवणार असल्याची घोषणा केली आहे. या खास ट्रेन 3 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनचे बुकिंग IRCTC चे संकेतस्थळ अथवा रेल्वे आरक्षण केंद्रावरून करता येऊ शकते. 

मध्य रेल्वेच्यावतीने या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनसाठीचे आरक्षण सुरू करण्यात सुरू करण्यात आले आहे. शनिवार, 20 नोव्हेंबरपासून प्रवाशी या स्पेशल ट्रेनसाठी आरक्षण करू शकतात. 

01596 मडगाव जंक्शन-पनवेल स्पेशल ट्रेन मडगाव स्थानकाहून 21 नोव्हेंबर ते 2 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन प्रत्येक रविवारी धावणार आहे. मडगावहून ही ट्रेन सायंकाळी 4 वाजता सुटणार असून पुढील दिवशी पनवेल येथे पहाटे 3.15 वाजता पोहोचणार आहे. 

01595 पनवेल-मडगाव जंक्शन स्पेशल ट्रेन 22 नोव्हेंबर 2021 पासून 3 जानेवारी 2022 पर्यंत चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन दर सोमवारी धावणार आहे. पनवेलहून सकाळी 6.05 वाजता ही ट्रेन प्रस्थान करणार असून त्याच दिवशी सायंकाळी 6.45 वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे. 

या स्थानकांवर थांबणार

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पेशल ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदूर्ग, कंकावली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबणार आहे. 

या स्पेशल ट्रेनच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. अथवा NTES App द्वारेही माहिती उपलब्ध होऊ शकेल. 

कोविड मार्गदर्शक सुचनांचे पालन 

रेल्वे प्रवासा दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांना सोशल डिस्टेंसिग व इतर नियमांचे पालन करावे लागणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

रेल्वेमध्ये कोरोना काळात बंद झालेली 'ही' सुविधा पुन्हा सुरू होणार

वाहन चालकांना नव्हे तर तळीरामांना दिलासा; परदेशी स्कॉच स्वस्त होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलंWalmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Embed widget