(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत आज 213 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 210 रुग्ण कोरोनामुक्त
Mumbai Coronavirus Updates : मुंबईत आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत आज 213 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
मुंबईत आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर सध्या 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत सध्या 1 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत आज 38,923 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 15 हजार 225 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतात सध्या 99,155 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1 टक्क्यांहून कमी आहेत, सध्या हे प्रमाण 0.29 टक्के आहे जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहेत. गेल्या 24 तासांत 6,918 रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत 3,40,60,774 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागण
महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यासोबतच पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.
Omicron Cases : महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागण
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, दोघे पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha