एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील पाऊस आणि 20 मोठे मुद्दे
मुंबईत यंदाच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तुफान पावसामुळे मुंबईकरांचा दिवस अक्षरश: पाण्यात गेला.
मुंबई: मुंबईत यंदाच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तुफान पावसामुळे मुंबईकरांचा दिवस अक्षरश: पाण्यात गेला. हवामान खात्यानं पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळं, मुंबईतल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून अनेक कार्यालय दुपारीच सोडण्यात आलेत.
सरकारी कार्यालयं देखील लवकर सोडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन पथक आणि एनडीआरएफच्या टीम्सही तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत दिवसभरात काय काय घडलं?
- मुंबईत विक्रमी पाऊस, वरळीत 303 मिमी पावसाची नोंद, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प
- रस्त्यांवर गुडघाभर पाणी, रेल्वे ट्रॅकवरुन प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी
- मुंबईकडे येणारे महामार्ग रोखले, एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुलीही थांबवली
- मुंबईत दूध,भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
- अनेक कर्मचारी कार्यालयांत अडकले, बुधवारी शाळा, कार्यालयांना सुट्टी
- दादर, माहिम, परळ, लालबाग परिसरातील वीज गायब
- एसटी डेपोत प्रवाशांची गर्दी, एसटीकडून कसारा, नाशिक मार्गावर जादा बसेस
- बेस्टकडून मुंबईत जादा बसेसचा पुरवठा
- सिद्धीविनायक ट्रस्टकडून पावसात अडकलेल्यांची मंदिरात राहण्याची सोय
- लालबागचा राजा मंडळाकडून पावसात अडकलेल्यांची जेवण-खाण्याची सोय
- मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकं मुंबईत
- मुंबईतील केईएम रुग्णालयात पाणी शिरलं
- रेल्वे बंद असल्याने कार्यालये दुपारी सोडूनही चाकरमानी स्टेशन्सवर अडकले
- महापालिकेची सर्व यंत्रणा रस्त्यावर, महापौरांचा दावा
- मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन नियंत्रण कक्षात धाव
- राष्ट्रपती,पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीची हमी
- ठाणे शहरातही वीजपुरवठा खंडीत
- मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द
- मुंबईत अनेक ठिकाणी रात्रभर फूडमॉल सुरु राहणार
- रस्त्यात कुठेही अडकल्यास हेल्पलाईन नंबर - 100 आणि 1916
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement