एक्स्प्लोर

Mumbai Rains : मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; आज मान्सून दाखल होण्याची शक्यता

Mumbai Rains : दक्षिण-पश्चिम मान्सून आज मुंबईत दाखल होऊ शकतो. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. पावसाच्या कोसळधारांनी मुंबईला चांगलंच झोडपलं आहे.

मुंबई : आज मान्सूनची मुंबईमध्ये एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मंगळवारी सकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग (IMD)नं मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगितलं आहे. 

दक्षिण-पश्चिम मान्सून आज मुंबईत दाखल होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

आयएमडीनं महाराष्ट्रात शनिवारी दक्षिण-पश्चिम मान्सून पोहोचणार असल्याची माहिती दिली होती. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनं शनिवारी रत्नागिरीत धडक दिली होती. मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असूनही मान्सूननं अद्याप मुंबईत धडक दिली नाही. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. कारण कालपासूनच मुंबईत मान्सूपूर्व पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

तळकोकणात 10 ते 15 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
Bhaskar Jadhav :....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
Ram Satpute: 'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
नव्या सरकारसमोर जुन्याच प्रश्नांची आव्हाने, नगरमध्ये महायुतीच्या 10 आमदारांसमोर या प्रश्नांचं चॅलेंज
नव्या सरकारसमोर जुन्याच प्रश्नांची आव्हाने, नगरमध्ये महायुतीच्या 10 आमदारांसमोर या प्रश्नांचं चॅलेंज
Embed widget