Mumbai Rains Update : मुंबईत पावसाची विश्रांती तर पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
![Mumbai Rains Update : मुंबईत पावसाची विश्रांती तर पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात Mumbai Rain Update Rain stops in Mumbai and heavy rains begin again in western suburbs Mumbai Rains Update : मुंबईत पावसाची विश्रांती तर पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/09/0f51337b856a3e6aefb10b0c44e06f4a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सीएसएमटी, भायखळा, लोवर परळ, लालबाग या ठिकाणी पाऊस सध्या बंद असून अधूनमधून हलक्या सरी सुरू आहेत. तर मुंबईतील दादर, हिंदमाता आणि सायन भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी थोडा पाऊस थांबल्यानंतर आता पुन्हा हळूहळू पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या पूर्व उपनगरत पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आतापर्यंत पूर्व उपनगरात 12 तासात सर्वाधिक 214.44 मिमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या पूर्व इशाऱ्यानुसार मुंबईत बुधवारपासून सलग चार दिवस अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळी 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त 285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Rain Update | मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटींग, जनजीवन विस्कळीत
चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शहर भागात रावली कॅम्प परिसरात सर्वात जास्त म्हणजे 282.61 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धारावी 276.92 मिमी, दादर 237.97 मिमी, माटुंगा 234.93 मिमी, वरळी 173.94 मिमी, मुंबई सेंट्रल 148.49 मिमी, भायखळा 127.74, मिमी, हाजीअली 124.19 मिमी, नरिमन पॉईंट येथे 53.22 मिमी आणि कुलाबा येथे 54.85 मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai Rain Update | मुंबईत मान्सूनचं दमदार आगमन! मुंबईसह उपनगरात पहिल्याच पावसाने दाणादाण
रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर
मध्य रेल्वेची धिमी मार्गिका सुरू, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धीम्या लाईन वर लोकल सेवा सुरु झाली आहे. सकाळी 9.50 ला सर्व मार्गिका बंद झाल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्यांदा लोकल सुरू झाल्या आहेत. सोबत सीएसएमटी ते गोरेगाव ही हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झालीय. आता केवळ सीएसएमटी ते वाशी ही वाहतूक बंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)