Mumbai Rain Update : मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Mumbai Rain Update : मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले होते. त्यामळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Mumbai Rain Update : मुंबई आणि परिसरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. दुपारी अडीच वाजता मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि आजूबाजूला मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परंतु, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली. डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरात अति तीव्र सरींची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
2.30 pm, Mumbai Thane NM Dombiwali & around has been raining very intensely since morning. Dombiwali recorded 94.3mm rainfall since morning & Thane NM Mumbai central & east suburbs hv recd some very intense spells in last 1 hour.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
Dadar, Eliphinston & around water logging possible pic.twitter.com/75tqY6Hw8A
आज राज्यभरातच मुसळधार पाऊस झाला. परंतु, मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले होते. त्यामळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शिवाय दादर, एलिफिन्स्टन आणि आसपास पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळी सात वाजल्यापासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊल झाला. दुपारी साडेचार नंतर पावसाने थोडीफार उसंत घेतली.
7/10: Mumbai its raining continuous since morning today. Rainfall figures at 4.40 pm since morning are...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
CSMT 56.5 mm
Chembur 44.5
Vidyavihar 40.0
Vikroli 36.5
Intensity of rains more towards eastern suburbs ..
Its likely to continue ahead pl. pic.twitter.com/PkWhef0COd
मुंबईत झालेला पाऊस
डोंबिवली 121.5 mm
ठाणे कल्याण 70-100 mm
मुंबई शहर 70-100 mm
पूर्व उपनगर 40-70 mm
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचेच
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसात राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. शिवाय या काळात सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता आहे.
येत्या ४,५ दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कृपया तपशीलांसाठी IMD वेबसाइट पहा.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
Mumbai Thane very cool strong breeze with light to mod showers since morning. Thane and up thunder reported too.
A typical rainy day... pic.twitter.com/J4Zr6VVkkn
महत्वाच्या बातम्या