Mumbai Rain : मुंबईसह परिसरात 1 जूनपासून आत्तापर्यंत 2 हजार मिमी पावसाची नोंद
मुंबईसह (Mumbai) परिसरात 1 जूनपासून 16 ऑगस्टपर्यंत 2 हजार मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai Rain : सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं. सध्या मुंबईत देखील चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईसह (Mumbai) परिसरात 1 जूनपासून 16 ऑगस्टपर्यंत 2 हजार मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर काल झालेल्या 57 मिली मीटर पावसामुळे 2 हजार मिमी पावसाचा आकडा ओलांडला आहे.
जूनमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहिला होता. मात्र, त्यानंतर जुलैमध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. मुंबईसह परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. जूनपासून आत्तापर्यंत मुंबई आणि परिसरात 2 हजार मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत मुंबईत 2 हजार मिमी, ठाण्यात 2 हजार 23 मिमी तर डहाणू 2 हजार 86 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे. आणखी पावसाचे दिवस संपले नाहीत. ऑगस्ट महिन्याचे राहिलेल 13 दिवस आणि सप्टेबंर पूर्ण महिना पावसाचा आहे. त्यामुळं आणकी चांगल्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा जोर वाढला
दरम्यान, विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात मुसळझार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यासह भंडारा (Bhandara) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळं प्रशासन सतर्क झालं आहे. भंडारा जिल्हातील पुरपरीस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत.
भंडारा जिल्ह्यात कालपासून पूरस्थिती उद्भवली आहे. ही पुरपरीस्थिती लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान, गडचिरोली, भंडारा चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गोसीखुर्द धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क असून गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात अनेक मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहे. तर भांडार शहरासह जिल्ह्यांमधून अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: