एक्स्प्लोर

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, पालिका अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Disaster Management MCGM अॅप आणि mcgm.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून त्यावर पर्जन्यामानाची, महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मुंबई : येत्या 8, 9 आणि 10 जूनला मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर मुंबई महापालिकेने आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने सर्व अधिकाऱ्यांची शनिवार आणि रविवारची (8 आणि 9 जून) सुट्टी रद्द केली आहे. तसेच, सर्व संबंधितांना अधिक सजग व सतर्क राहण्याचे महापालिका प्रशासनाने आदेश दिले आहेत. संभाव्य अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज :
  • महानगरपालिकेच्या संबंधित खातेप्रमुखांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना आपआपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • नौदल, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या अधिकाऱ्यांनी विविध विभागातील धोकादायक ठिकांणाची रेकी केलेली आहे.
  • महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच, रिफ्लेक्टिव्ह जॅकेटसह मनुष्यबळ, यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात आल्याची खातरजमा हॉटलाईनवरुन संपर्क साधून करण्यात आली.
  • पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मुंबई शहर व उपनगरात पाण्याचा निचरा करण्यासाठी लावण्यात आलेले पम्पिंग स्टेशन डिझेल व मनुष्यळासह कार्यरत राहतील याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व उदंचन चालकांशी संपर्क साधून ते आपआपल्या जागी सतर्क आहेत याची खातरजमा करण्याच्या सूचना मुख्य नियंत्रण कक्षातील पम्पिंग स्टेशन समन्वयकांना देण्यात आल्या आहेत.
  • इतर महत्वाचे नियंत्रण कक्ष जसे की, अग्निशमन निंयंत्रण कक्ष, तटरक्षक दल, दोन्ही रेल्वे नियंत्रण कक्ष, बीईएसटी नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष यांना वेधशाळेचा इशारा कळवून सतर्क रहाण्याच्या तसेच आपआपली आणीबाणी मदत पथके सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • महावितरण, रिलायन्स एनर्जी, बीईएसटी (विद्युत पुरवठा) यांना कुलाबा वेधशाळेचा इशारा कळवून त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात सतर्क रहाण्याच्या तसेच त्यांची आणीबाणी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
  • मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात पुरेसे मनुष्यबळ तिन्ही सत्रामध्ये उपलब्ध असेल याची खातरजमा करण्यात आली आहे.
  • 14 आणीबाणी मदत यंत्रणांपैकी (Emergency Support Functions) आवश्यक असलेलया यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून त्यांना मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात 7 जूनपासून उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • 24 विभागातील प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना आणीबाणी परिस्थिती उद्भ्वल्यास नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याकरिता तात्पुरते निवारे (Temporary Shelters) म्हणून घोषित करण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळा काळजीवाहू कर्मचा-यांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
  • मुंबईस पाणी पुरवठा करण्यात येणा-या तलावांच्या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यास व धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरास धोका निर्माण होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
  • भरतीच्या वेळेस फल्ड गेट बंद करण्यात आल्यामुहे पाण्याचा निचरा करण्याकरिता किती पंप प्रत्येक पंपिंग स्टेशनला सुरु करण्यात आले आहेत याची माहिती मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना पंपिंग स्टेशनच्या अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
  • मुंबई अग्निशमन दलाची पूर बचाव पथके अग्निशमन दलाच्या सहा प्रादेशिक केंद्रावर आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी शहर भागाकरिता शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र परळ येथे, पश्चिम उपनगराकरिता अंधेरी क्रीडा संकुल येथे व पूर्व उपनगराकरिता मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे पूर बचाव साहित्यासह 7 जूनपासून तैनात करण्यात आले आहे.
  • नौदलाची पथके कुलाबा, वरळी, घाटकोपर,मालाड, ट्रॉम्बे येथे तैनात ठेवण्यात आले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बृहन्मुंबईतील सहा समुद्रांवर सुरक्षितेच्या दृष्टीने अग्निशमन दल, पोलीस, शहर आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या जवानांना 8 जूनपासून तैनात करण्यात येणार आहे.
  • पावसात मोठया प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या 24 विभागांमध्ये उद्यान विभागाच्या कर्मचारी वर्ग वाहने व इतर आवश्यक त्या साहित्यासह 24 तास तैनात करण्यात आला आहे.
  • मुख्य नियंत्रण कक्ष, ठाणे व नवीमुंबई महापालिकेच्या हॉट लाईनवरुन दोन्ही नियंत्रण कक्षांच्या अधिका-यांशी समन्वय ठेवण्यात आला तसेच त्यांच्या परिसरातील पावसाची माहिती सुद्धा माहिती घेण्यात येणार आहे.
  • Disaster Management MCGM अॅप आणि mcgm.gov.in  हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून त्यावर पर्जन्यामानाची, महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.पूर व्यवस्थापन मार्गदर्शिका व दूरध्वनी पुस्तिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या : मुंबईकरांनो, 8, 9 आणि 10 तारखेला गरज असेल तरच बाहेर पडा!प् मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, उपनगरातही सरीवर सरी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget