एक्स्प्लोर

कुर्ला स्टेशनवर मोबाईल चोरणारी लेडी गँग जेरबंद

लोकल रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या महिला टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे.

मुंबई: लोकल रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या महिला टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना काही महिलांची हालचाल संशयास्पद असल्याचं आढळून आलं. या महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी या महिलांकडे असलेल्या बॅगेत तब्बल 25 महागडे मोबाईल फोन मिळून आलेत. या सर्व मोबाईलची किंमत अंदाजे 2 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. लोकलमध्ये हे फोन चोरल्याची कबुली अटकेत असलेल्या महिलांनी दिली. मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यापैकी एक टोळी या निमित्ताने जेरबंद झाली आहे. बसंती बाई रामरथ चौहान,सोनिया विजय मोगिया आणि राजाबाई सीताराम मोगिया सर्व राहणार मध्य प्रदेश अशी या टोळीतील मोबाईल चोरी करणाऱ्या महिलांची नावे आहेत. बुधवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. लोहमार्ग पोलिसांचे पथक हे लोकमान्य टिळक टर्मिनल्स परीसरात गस्त घालत असताना काही महिलांची हालचाल संशयास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी निर्भया पथकाच्या मदतीने या महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यात एकूण 25 महागडे मोबाईल आढळून आले, ज्याची किंमत अंदाजे 2 लाख 94 हजार 84 रुपये इतकी आहे. पोलिसांनी या महिलांविरोधात गुन्हा नोंदवून, त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget