एक्स्प्लोर

पत्नीविरुद्ध शेरेबाजी करण्यास हटकल्याने फेरीवाल्यांची पीएसआयला मारहाण

याबाबत पोलीस उपनिरीक्षकाने एका फेरीवाल्याला जाब विचारुन हटकलं. यामुळे संतापलेल्या इतर फेरीवाल्यांनी पीएसआयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुंबई : फेरीवाले किती मुजोर झाले आहेत, याचं उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं. पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याने फेरीवाल्याच्या टोळक्याने चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केली. परळमधील केईएम रुग्णालयासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर तीन जण पसार झाले आहेत. नेमकं काय घडलं? रफी अहमद किडवई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या आजारी भावावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला भेटण्यासाठी पीएसआय पत्नीसोबत 24 नोव्हेंबर रोजी केईएममध्ये जात होते. यावेळी पीएसआय सिव्हिल ड्रेसवर होते. पाण्याची बॉटल घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयाच्या समोरील दुकानात गेले असता, तिथल्या फेरीवाल्यांनी पत्नीविरोधात अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु फेरीवाल्यांची शेरेबाजी काही थांबत नव्हती. याबाबत पोलीस उपनिरीक्षकाने एका फेरीवाल्याला जाब विचारुन हटकलं. यामुळे संतापलेल्या इतर फेरीवाल्यांनी पीएसआयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर टॅक्सीत घालून मारहाण केली. पीएसआयने मदतीसाठी आरडाओरडा केला. एका पादचाऱ्याने याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही टॅक्सी पकडली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चार आरोपींना पळ काढण्यात यश आलं. पोलीस खात्याच्या उदासिनतेमुळे पीएसआय तणावाखाली परंतु या प्रकरणात पोलिसांची उदासिनता पुन्हा एकदा समोर आली आहे. संबंधित घटना 24 नोव्हेंबर रोजी घडली. यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 28 नोव्हेंबरला आरोपींवर लावलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली. मग आणखी दोन दिवसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली. "पोलीस उपनिरीक्षक असल्याचं सांगूनही पोलीस स्टेशनमध्ये कोणीही दखल घेत नव्हतं. छेड काढणाऱ्यांना हटकलं म्हणून मारहाण झाली. तरीही स्वत:चं पोलीस खातंच याची नोंद घेत नाही," असं पीएसयआने सांगितल्याचं कळतं. तसंच या सगळ्या प्रकारामुळे पीडित पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पत्नी अतिशय तणावाखाली असल्याचं समजतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget