एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची भाषा

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

मुंबई : काँग्रेस स्थापनादिनानिमित्त आज मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. यावेळी मंचावर उपस्थित सर्वच नेत्यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची भाषा केली आहे. सुरुवातीला मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढू द्या, अशी मागणी मंचावर उपस्थित नेत्यांकडून केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा इरादा बोलून दाखवला.

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त आज वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, नसीम खान, एकनाथ गायकवाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. नसीम खान यांना सांगतो काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड करणार नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.'

काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा? आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्येच एकमत नाही?

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. काँग्रेससोबत नसती तर राज्यात सरकार बनलं नसतं, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला नाव न घेता इशारा दिला. कॉमन मिनिमम प्रोग्रामसोबत कॉम्प्रमाईज करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'आत्या-भाच्या'वर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी!

BMC Elections | मुंबई महापालिकेवर कुणाचा भगवा फडकणार? दीड वर्ष अगोदरच ताकद आजमावणं सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget