एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'आत्या-भाच्या'वर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी!

मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम दोन वर्ष आधीच वाजायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप, शिवसेना, काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही तयारीला लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतं.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्ष शिल्लक आहेत, परंतु सर्वच पक्षांनी त्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुनच निवडणूक लढवावी असा विचार मांडला आहे. विशेष म्हणजे मुंबईत संघटना मजबूत करण्यासाठी आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे लक्ष घालणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम दोन वर्ष आधीच वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपने मिशन मुंबई अंतर्गत रणनीती आखली आहे. तर शिवसेनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बीएमसीमधील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढावी असं म्हटलं आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक आघाडीतच लढवावी अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.

खरंतर शिवसेनेच्या साथीने लढल्यास राष्ट्रवादीचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राष्ट्रावादीचं कायमच मुंबईकडे दुर्लक्ष झालेलं आहे, असं नवाब मलिक यांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला कसर भरुन काढायची आहे. राष्ट्रवादीकडून मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वॉर्डमध्ये तयारी सुरु आहे. कार्यकर्त्यांना तयार केलं जात आहे, नवीन चेहऱ्यांना संधी दिली मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे चेहरे म्हणून ओळख असलेल्या सचिन अहिर, प्रकाश सुर्वे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर मोठ्या नेत्यांना पक्षाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालतील, या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होतील, असं म्हटलं जात आहे. जबाबदारीचं अधिकृत वाटप झालेलं नसलं तरी कोविड काळाच्या आधी जसे मेळावे भरत होते तसेच मेळावे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा भरवले जातील. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असं सांगितलं जात आहे.

BMC Elections | मुंबई महापालिकेवर कुणाचा भगवा फडकणार? दीड वर्ष अगोदरच ताकद आजमावणं सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवानाThane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्दMumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget