एक्स्प्लोर
Advertisement
महापरिनिर्वाण दिनावर ओखीचं सावट, पावसामुळे शिवाजी पार्कात चिखल
वादळामुळे मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भीमबांधवांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे.
मुंबई : ओखी चक्रीवादळाचा फटका मुंबईसह राज्यभरात पाहायला मिळत आहे. ह्या वादळाचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनावरही झाला आहे. वादळामुळे मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भीमबांधवांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे.
70 शाळांमध्ये राहण्याची सोय
ओखी वादळ आणि पावसामुळे परिस्थिती बिकट झाल्याने मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे.
बेस्टच्या अतिरिक्त बस
ओखीचा परिणाम उद्यापर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी मात्र जास्त असेल. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत.
समुद्रकिनारी कडेकोट पोलिस बंदोबस्त
दादरचा समुद्रकिनारा पोलिसांनी वेढलेले आहेत. नागरिकांना सूचना देण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्राला उधाण आल्याने कोणीही किनाऱ्यावर जाऊ नये, यासाठी फेन्सिंगही टाकण्यात आलं आहे.
महापालिका अलर्टवर
ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही अलर्टवर आहे.
- दक्षतेसाठी दादर चौपाटीवर जाणारे सहा मार्ग बंद करण्यात आले आहेत.
- तसंच दादर चौपाटीवरील सर्व दुकानंही हटवली आहेत.
- 6 डिसेंबरला म्हणजेच उद्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनाही दादर चौपाटीवर जाण्यास बंदी, मात्र त्यांना चैत्यभूमीवर जाता येईल. - याशिवाय नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफसह मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल सज्ज झालं आहे.
- शिवाजी पार्क व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथे तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालयं, स्नानगृहं आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.
इथे वाहनांच्या पार्किंगला बंदी
एस. व्ही. एस. रोड
रानडे रोड
एन. सी. केळकर रोड
केळुस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर)
गोखले रोड, दक्षिण व उत्तर
टिळक ब्रीज
भवानी शंकर रोड
एस. के. बोले मार्ग.
सेनापती बापट मार्ग
फाइव्ह गार्डन्स, माटुंगा
माहिम रेती बंदर
अनुयायांच्या मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक
याशिवाय नंदेश उमप यांसारखे कलाकार, स्वयंसेवक शिवाजी पार्कमध्ये स्वत: हजर राहून अनुयायांची मदत, मार्गदर्शन करत आहेत. प्रवेशद्वारावर फलक नसल्याने अनेकांना सूचना कळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे इथे स्पीकरची व्यवस्था करण्याची मागणी नंदेश उमप यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement