एक्स्प्लोर

जीएसटीच्या बोजामुळे महाराष्ट्र खड्ड्यात?

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे बुजवण्यासाठी किती डेडलाईन दिल्या, त्याला माप नाही. पण यावेळी एक वेगळंच विघ्न समोर आलंय, ते म्हणजे जीएसटी. जीएसटीमुळे महाराष्ट्र आणखी काही काळ खड्ड्यात राहण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातली जनता एका मूलभूत हक्कासाठी भांडत आहे, ते आहेत इथले रस्ते. खड्ड्यात गेलेल्या महाराष्ट्राला टोल नावाचं एक ग्रहण लागलं आहे. त्यातून मुक्ती देण्याचं आश्वासन देऊन फडणवीस सत्तेत आले. पण महाराष्ट्र काही खड्ड्यातून बाहेर आला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे बुजवण्यासाठी किती डेडलाईन दिल्या, त्याला माप नाही. पण यावेळी एक वेगळंच विघ्न समोर आलंय, ते म्हणजे जीएसटी. जीएसटीमुळे महाराष्ट्र आणखी काही काळ खड्ड्यात राहण्याची शक्यता आहे. चांदा ते बांदा कुठेही जा.. रस्ते खड्ड्यात दिसतील.. टोलमुक्ती दूरच, किमान रस्ते तरी नीट करा, अशी हाक दिल्यानंतर चंद्रकांतदादा जागे झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्यासाठी डिसेंबरची डेडलाईन दिली. पण जीएसटी लागू होण्याआधी व्हॅट चुकता करुन कंत्राटं घेतलेले ठेकेदार 18 टक्के जीएसटीत अडकले. त्यामुळे राज्यातील 65 हजार कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याच्या कामावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. हे झालं एक कारण. पण गेल्या तीन वर्षापासून बांधकाम विभागानं कंत्राटदारांचे 3 हजार 400 कोटी रुपये थकवले आहेत. ज्यात रस्त्याची कामं घेणाऱ्या ठेकेदारांचे 2 हजार 400 कोटी रुपये आहेत. याशिवाय रस्ते देखभालीबद्दलचे नियमही जाचक असल्याचा आरोप आहे. या सगळ्याचा फटका अडीच कोटी मजुरांना बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र ठेकेदारांचे सगळे आक्षेप दूर केल्याचा दावा केला आहे. तसंच अघोषित बहिष्कार मागे घेतला नाही तर बांधकाम विभाग स्वत: खड्डे बुजवण्याचं काम हाती घेईल असं म्हटलं आहे. मोदी आणि शिंजो आबे परवा बुलेट ट्रेनसाठी कुदळ मारतील. 2022 पर्यंत मुंबईतून अहमदाबादला तुम्ही 2 तासात पोहोचाल. पण ठाण्यातून मुंबईत आणि पुण्यातून साताऱ्याला जायला तुम्हाला दिवस लागतो, हे चंद्रकांतदादांनी लक्षात घ्यायला हवं.

महत्त्वाच्या बातम्या

MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget