एक्स्प्लोर
मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल, सुरक्षेत वाढ

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल आला आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांमधील पोलिस उपायुक्तांना अज्ञात महिलेकडून ईमेल आला. या ईमेलनुसार, महिलेने विमानतळावर तीन व्यक्तींमधील संवाद ऐकला. ते तिघेजण मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून विमान हायजॅक करण्याबाबत बोलत होते, असं महिलेने ईमेलमध्ये सांगितले आहे. अज्ञात महिलेच्या ईमेलनतर मुंबई पोलिसांनी विमानतळ आणि परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. शिवाय, कसून तपास सुरु केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळणे बाकी आहे. मात्र, खबरदारी म्हणून मुंबईसह हैदराबाद, चैन्नई येथील विमानतळांवर सीआयएसएफच्या जवानांसह चोख सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात येते आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























